Friday, May 06, 2011

पहिला प्रयत्न

कॉपी-पेस्ट मेथड पडली महागात
अनिकेत चिनके, बारामती
सबमिशनसाठी चाललेली धावपळ सगळ्यांनाच माहिती आहे. जरनल्स लिहिताना इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेव्हा जर्नल्स लिहायला घेतात, तेव्हा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातले काही प्रसंग भयंकर... तर काही फारच "फनी' असतात. असेच अनुभव मलाही आले आहेत. त्यातला एक अनुभव शेअर करत आहे. आता तो कुठल्या कॅटेगरीत येतो, ते तुम्हीच ठरवा...

मी सांगलीतील वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होतो. मलाही सगळ्याच विषयांची जर्नल्स सबमिट करायची वेळ आली होती. त्यामुळे मी मित्रांबरोबर एएनएनचं जर्नल लिहायला बसलो होतो. पूर्णपणे "कॉपी-पेस्ट' मेथड वापरत होतो. अजून टेक्‍निकल शब्द फारसे माहीत नव्हते. कॉपी-पेस्ट करताना अनेक टेक्‍निकल शब्द कळत नव्हते. त्यांचे अर्थ मी मित्रांना विचारायला सुरवात केली. मित्रांनी एका वाक्‍यात उत्तर दिले, ""तू आपली "कॉपी-पेस्ट मेथड' वापर. जर टेक्‍निकल शब्द आला, तर तो सिम्बॉल समजून पेस्ट करून टाक.'' मी त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. त्यानंतर झालेली फजिती आठवली, की मात्र हसू येते.

कॉलेजमध्ये गेलो. टीचरनी माझं जर्नल तपासायला सुरवात केली आणि मला बरोबर पकडलं. त्यांनी मला त्यादिवशी नेमके टेक्‍निकल शब्दांचे अर्थ विचारले. मी "कॉपी-पेस्ट' मेथड वापरल्यामुळे मला एकाही शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. त्यामुळे टीचरनी सगळ्या वर्गासमोर माझा चांगलाच समाचार घेतला. हा प्रसंग मी आयुष्यभर विसरू शकत नाही....

2 comments:

  1. it was great to read as old memories were refreashed again

    ReplyDelete
  2. पकडला जाईल तो चोर

    ReplyDelete